English   |   मराठी
 

 

    ‘सिम’ फॉर इंडिया

 

 

 

 

 

भारत एका वेदनादायी संक्रमणावस्थेतून जात आहे ....हे संक्रमण सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय तसेच आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. बदल हा जरी निसर्गाचा कालातीत नियम असला तरी तो आपल्याबरोबर घेऊन येतो अनेकानेक आव्हाने. लोक या बदलांशी कधी उत्तमपणे जुळवून घेतात तर कधीकधी संघर्ष करतात. सध्या तर या बदलांची जणू त्सुनामीच आली आहे. त्सुनामींचा सामना एकेकट्याने करणे शक्य नसते. लोकांनी एकत्र येवून काही संरचनात्मक उपाय त्यासाठी योजावे लागतात. ‘सिम फॉर इंडिया’ हा त्या दिशेने होत असलेला एक धाडसी प्रयत्न आहे.

‘सिम फॉर इंडिया’ हे एक असे व्यासपीठ अस्तित्वात येत आहे जिथे मानवतावादी आणि सर्वसमावेशकतेच्या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना अभिप्रेत असा बदल स्वतः घडविण्याची संधी मिळणार आहे. अपेक्षित बदल सहजसाध्य नाही आणि आपल्याला एकमेकांना आधार देत आणि पूरक ठरतच हा बदल घडवावा लागणार आहे.

‘सिम फॉर इंडिया’ मध्ये आपल्या शहराच्या, देशाच्या आणि या विश्वाच्या उन्नतीसाठी आपल्या कल्पनांचे, सूचनांचे आणि उपायांचे स्वागत आहे. जशी प्रत्येक प्रवासाची सुरवात एका छोट्याश्या पावलानेच होते तसाच प्रयत्न आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. सिम खिरीड हे पुणे लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहेत.

आजची भारताची राजकीय व्यवस्था अस्थिरतेच्या गर्तेत सापडली आहे. भारताची बहुसंख्य जनता वय वर्ष ४० च्या आत आहे पण राजकीय पक्षांमध्ये आपण सत्तरीतील बुजुर्ग लोकांचीच गर्दी पाहतो आहे. यातून पिढ्यांची....उर्जेची ....आणि भविष्याची विसंगती समोर येते. ही विसंगती मिटवण्यासाठी आणि भारताचे भविष्य त्यांच्या हाती असणे गरजेचे आहे अशा बहुसंख्यांक युवक वर्गाच्या हाती सोपविण्यासाठी युवकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच पाहिजे आणि म्हणूनच सिम खिरीड आपले युवा उमेदवार म्हणून उभे आहेत.

भारतासाठी एका परिपूर्ण दूरदृष्टीचा अभाव सर्वच राजकीय पक्षांकडे दिसून येतो. प्रत्येकाकडे निवडक असे चांगले मुद्दे आणि धोरणे आहेत. एक अपक्ष उमेदवार असण्याचा फायदा असा की तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव तुमच्या जाहीरनाम्यात आणि कार्यप्रणाली मध्ये करू शकता. कोणत्याही एका पक्षाच्या ध्येय धोरणाची मर्यादा येथे राहत नाही.

आम्ही आपले या उपक्रमात हार्दिक स्वागत करतो. आपणही या उपक्रमामध्ये आपल्या इच्छेनुसार सहभागी होवू शकता. हा सहभाग कल्पना, सूचना, आर्थिक मदतीच्या किंवा आपल्या अमूल्य वेळेच्या स्वरुपात असू शकतो. आपण कार्यकर्ते बनूनही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी थेट योगदान देवू शकता.
 
 
                               ईमेल : sim4india@gmail.com     
© ‘सिम’ फॉर इंडिया. सर्व हक्क सुरक्षित.