English   |   मराठी
 

 

    सिम’च का ?

 

 

 

 

 

‘एक माणूस काय करू शकतो?’

या प्रश्नाचं साधं सोप्पं उत्तर आहे .... बरंच काही!

कोणत्याही मानसिक शृंखला आणि ओझ्यांशिवाय सिमकडे प्रत्येक विषयासाठी एक असा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आहे. कोणत्याही एका विशिष्ठ विचारसरणी पासून मुक्त असल्यामुळे सिम समाजातील विविध प्रवाहांना एकत्र आणून आपले सर्वांचे सामायिक उद्दिष्ट पूर्णत्वास सक्षमपणे नेउ शकतो.

माझी पुण्यासाठीची ध्येय आणि धोरणे पुढीलप्रमाणे आहेत -

१) पुण्यातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी व्यवहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण - यामध्ये संवाद कौशल्ये, आर्थिक साक्षरता, इत्यादींचा समावेश आहे.
२) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – ६ लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या PMPML चा कारभार वाहतूक क्षेत्रातील तज्ञांद्वारे चालवला जाईल.
३) आधारभूत संरचना विकास -

  • विमानतळ
  • रिंग रोड
  • मुख्य रस्ते
  • शाळा
  • महानगरीय घन कचरा व्यवस्थापन

४) स्त्री सशक्तीकरण – स्वसंरक्षण, कौशल्ये निर्मिती, सूक्ष्म वित्त पुरवठा पर्याय, इत्यादी.
५) सार्वजनिक आणि खाजगी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे. (प्रथम, TFI आदी संस्थांच्या मदतीने)
६) न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालतींची स्थापना करणे.
७) पावसाच्या पाण्याचा सुनियोजित पुनर्वापर
८) सौर शहर संकल्पना राबविणे
९) नागरिकांच्या समस्या आणि सूचना स्वीकारण्यासाठी इंटरनेट तसेच अद्ययावत दूरध्वनी यंत्रणेचा वापर
१०) निवास व्यवस्था - कंटेनरचा वापर करून १ किंवा २ अपत्य असलेल्या नोकरदार लोकांसाठी पर्यायी निवास व्यवस्था
११) सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे पूरक सेवांच्या माध्यमातून सशक्तीकरण करणे
१२) योग्य प्रशिक्षण देवून माहितीच्या अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची फळी उभी करणे जेणे करून सरकारी धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवता येईल.
१३) वायू आणि जल प्रदूषण - TERI या नामांकित संस्थेबरोबर सहकार्य करार करून परिणामकारक आणि व्यवहारिक उपाय शोधणे.
१४) स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून उपहारगृहे आणि स्वच्छतागृहे चालविणे.
१५) १०८ ही रुग्णवाहिका सेवा अस्तित्वात येण्यासाठी जोर देणे.
१६) पुणे आणि परिसरातील टेकड्यांवरती वनीकरण करणे तसेच शहराच्या सीमेअंतर्गत वृक्षारोपण करणे.
१७) मराठी कला आणि साहित्याच्या संवर्धनासाठी वार्षिक आंतरराष्ट्रीय महोत्सव भरविणे.
१८) आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सवाचे आयोजन करणे.

भारतासाठी

१) सेवा संस्थांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मापदंड निर्धारण आणि मापन करणे.
२) चलनवाढीची मुळ कारणे ध्यानात घेवून संरचनात्मक उपाययोजना करणे.
३) प्रतिव्यक्ती रुपये पाच लाखापर्यंतचे वार्षिक व्याज उत्पन्न करमुक्त करणे.
४) वाहतूक व्यवस्था, औद्योगिक क्षेत्र, इमारती आणि नित्य व्यवहारातील वस्तूंमध्ये उर्जेचा कार्यक्षमतेने वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.
५) सेवांच्या उत्तम वितरणासाठी सरकार आणि जनतेमधील सर्व प्रक्रिया-पद्धतींमध्ये आमुलाग्र बदल घडविणे.
६) अस्तित्वात असलेल्या संविधानिक संस्थाच्या (निवडणूक आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, नियंत्रक व महालेखापरीक्षक, इत्यादी) माध्यमातून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणे.
७) यशस्वी गाथांची संदर्भ संचयीका तयार करणे जेणे करून पंचायत, महानगरपालिका, राज्य तसेच केंद्र सरकारच्या उपक्रमांची माहिती एकत्रित करून प्रसारित करणे सोपे होईल.
८) सामुदाईक महाविद्यालयांच्या (कम्युनिटी कॉलेज )माध्यमातून वयोमर्यादाविरहीत शिक्षणाची सर्वांसाठी सोय करणे.

 
 
                               ईमेल : sim4india@gmail.com     
© ‘सिम’ फॉर इंडिया. सर्व हक्क सुरक्षित.